Disha Shakti

राजकीय

जाफराबादच्या उपसरपंच पदी ज्योती नांगळ यांची बिनविरोध निवड

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी ज्योती ज्ञानेश्वर नांगळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. मागील काही दिवसांपूर्वी निवडणुक पार पडली होती यामध्ये लोकनियुक्त सरपंच शारदा संदीप शेलार या विजयी झाल्या होत्या त्यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड पार पडली.

यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून म्हणून नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे हे होते तर सचिव म्हणून ग्रामसेवक राजू ओहोळ यांनी काम पाहिले या बैठकीत उपसरपंच पदासाठी नियमांनुसार नामनिर्देशन पत्र मागविण्यात आले होते त्यामध्ये फक्त उपसरपंच पदासाठी ज्योती ज्ञानेश्वर नांगळ यांचा एकच अर्ज प्राप्त झाला त्यानुसार उपसरपंच पदासाठी ज्योती ज्ञानेश्वर नांगळ यांच्या नावाची सूचना नूतन सदस्य संदीप शेलार यांनी मांडली असता या प्रक्रियेमध्ये ज्योती ज्ञानेश्वरांचा एकमात्र अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यामुळे त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे यांनी बिनविरोध निवड झाली असल्याचे जाहीर केले.

सौ. ज्योती ज्ञानेश्वर नांगळ यांची जाफराबाद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी केली


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!