राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जनसेवा मंडळाचे सदस्य गणेश माणिक तारडे यांची निवड झाली आह़े. ब्राम्हणीच्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णा सुरेश बानकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी २ वाजता ही सभा पार पडली.
यामध्ये उपसरपंच पदासाठी जनसेवाचे गणेश माणिक तारडे व महेंद्र नारायण तांबे यांचे दोन अर्ज दाखल झाले होते.यामध्ये गणेश तारडे यांनी सर्वाधिक १० तर, महेंद्र तांबे यांना ८ मते पडली. त्यामुळे निवडणूक निरीक्षक अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे व सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी माणिकराव घाडगे यांनी गणेश तारडे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते.
Leave a reply