दिशाशक्ती प्रतिनिधी / गणेश राशीनकर : छत्रपती संभाजी नगर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाजवळ धनगर समाजाच्या वतीने धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज बांधव मेंढ्यासह दि १९ रविवार पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनाच्या निषेधार्थ धनगर समाज अनुसूचित जाती आरक्षण अंमलबजावणीसाठी गंगापूर तालुक्यातील शिरूडी येथील मेंढपाळ हरिश्चंद्र वैद्य हे आपल्या मेंढ्यासह आमरण उपोषणाला बसले आहे.धनगर समाजाला शासन आरक्षण अंमलबजावणीच्या संदर्भात खोटे आश्वासन देऊन समाजाची दिशाभूल करत आहे धनगर समाज हा राज्य घटनेमध्ये अनुसूचित जमात असताना आणि भारतीय जनता पार्टीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आल्याच्या नंतर पहिल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये आरक्षण देतो असे आश्वासन दिले होते.
तसेच चौंडी येथे समाज बांधव उपोषणाला बसले असताना शासनाचे प्रतिनिधी गिरीश महाजन यांनी देखील येऊन पन्नास दिवसात आरक्षणाचा विषय मार्गी लावू असे आश्वासन दिले होते शासन समाजाला आरक्षणासाठी झुलवत ठेवत आहे.
धनगर समाजाच्या परिस्थिती हालकीची असून आरक्षणाच्या सवलती भेटत नसल्या कारणाने समाजाचा शैक्षणिक, राजकीय सामाजिक स्तर अतिशय खालवला असून अतिशय वाईट वेळ ही समाजातील युवकावर आली आहे अशा परिस्थितीत शासन केवळ खोटे आश्वासन देत प्रत्यक्षात काहीच देत नाही कुठल्याही प्रकारे धनगर समाजाच्या लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ भेटला नाही शेळ्या देतो मेंढ्या देतो धनगर समाजाच्या तांडा वस्तीला निधी देतो असे अनेक खोटे आश्वासन देण्यात आले परंतु प्रत्यक्षात कुठेही अंमलबजावणी झाली नाही अशा या सर्व निष्क्रिय धोरणामुळे आज समाजावर आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.
यावेळी धनगर समाजाचे नेते रामनाथ मंडलिक, रंगनाथ राठोड, प्रल्हाद बंटी दादा सोनवणे सोरमारे अरुण रोडगे, दिलीप रिठे संपत रोडगे, नारायण खोसे संजय फटांगडे, विनोद सोनवणे, ज्ञानू नगरे, कैलास गायके, प्रवीण देवकर, अशोक करडे, अरुण सागर मारुती तांबे नामदेव तांबे बाबासाहेब तांबे रमेश तांबे रमेश मतकर, सतीश पाल्हाळे, पृथ्वीराज तोगे, रामेश्वर लाव्हाळे, विजय वैद्य,बापू पोकळे, प्रदीप नाचन,ज्ञानेश्वर बडूगे , श्याम गुंजाळ, रमेश काटकर, गणेश रोडगे, अशोक नाचन, रमेश मतकर, अशोक बुट्टे, बाबासाहेब नजन, नामदेव ढवान, संतोष काटकर, यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित आहे
छत्रपती संभाजीनगर शहरात धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षण अमलबजावणी साठी अमरण उपोषण सुरू

0Share
Leave a reply