Disha Shakti

इतर

नांदगाव तालुक्याला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले

Spread the love

नांदगाव  प्रतिनिधी / खंडू भाऊ कोळेकर : आधीच दुष्काळी परिस्थिती व त्यातच बे मोसमी पाऊस व गारपीटचा तडाखा. पाण्याअभावी संपूर्ण शिवार कोरडा दिसतो त्यातच थोडफार पीक जीवाचं रान करून आटापिटा करून वाचविले होते तेही पीक आता अवकाळी पाऊस व गारपीटीने संपवले .त्यामुळे शेतकऱ्याने जगावे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे.

तरी त्वरित पंचनामे करून भरपाई मिळावी तसेच पीक विम्याचे पैसे त्वरित अदा करावे दुष्काळ निधी मिळावा गुरांच्या चाऱ्याची व पाण्याची सोय सरकारने त्वरित करावी अशी मागणी सर्व शेतकऱ्यांकडून होत आहे तसेच वाखारी व पिंपराळे शिवारात मोठ्या स्वरूपाची गार आढळून आली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!