नांदगाव प्रतिनिधी / खंडु कोळेकर : नांदगाव तालुक्यातील पिंप्राळे येथे दिनांक २६/११/२०२३ रोजी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष सागर फाटे, शहर अध्यक्ष उमेश उगले ,सामाजिक कार्यकर्ते विनोद अहिरे, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते डॉक्टर सदगीर, गणेश शेरमाळे, पत्रकार खंडू कोळेकर यांनी ग्रामीण भागातील जनतेला भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मन की बात कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती मिळावी, देशात कुठे काय चालू आहे.
याबाबतची माहिती बाबत नागरिकांना समजावे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या काही अडचणी असतील काही केंद्राच्या योजना असतील किंवा सध्या दुष्काळ सदृश्य असलेल्या परिस्थितीचा सामना करत असलेल्या जनतेचा पाणीटंचाईचा प्रश्न असेल, तरुणांचा स्वयंरोजगाराचा प्रश्न असेल अशा एक ना अनेक विषयांवर चर्चा घडवून आणण्यासाठी मन की बात कार्यक्रमा च्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंप्राळे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी पिंप्राळे येथील नागरिकांना मन की बात कार्यक्रम थेट टीव्हीवरून दाखविण्यात आला.
सागर फाटे यांनी मन की बात कार्यक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती देऊन नागरिकांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ कसा मिळवून घेता येईल याबाबत माहिती दिली.डॉ. सदगीर व गणेश शेरमाळे उमेश उगले यांनी गावातील प्रश्न मांडले व तरुणांमध्ये चर्चा घडवून आणली. नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा शासकीय योजना लाभापासून वंचित राहावे लागत असेल त्या संदर्भात कुठली अडचण निर्माण होत असेल तर आपल्याशी संपर्क साधा आपल्याकडून सर्वतोपरी मदत आपणास केली जाईल असे सागर फाटे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
ग्रामस्थांच्यावतीने आयोजकांचा सत्कार देखील करण्यात आला. विनोद अहिरे यांनी यावेळी सूत्रसंचालन केले
Leave a reply