विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण ( पारनेर ) : जाती धर्मात व्देष पसरत चालला असताना थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे समतेचे विचार समाजाला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन टाकळी ढोकेश्वर चे सरपंच बाळासाहेब खिलारी यांनी केले आहे .
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकश्वर येथे महात्मा फुले समता परिषद आणि श्री संत सावतामाळी मित्रमंडळच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महात्मा फुले चौकात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच बाळासाहेब खिलारी , महावीर उद्योजक समुहाचे प्रमुख राजेश भंडारी, राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य वसंत रांधवण, बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण पायमोडे, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बबनराव घुमटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष मळीभाऊ रांधवण, महेश पाटील, विलास धुमाळ, विलास ठुबे, डॉ सुनील खेडकर, जयसिंग झावरे, प्रकाश इघे सर, योगेश पायमोडे, विठ्ठलराव पायमोडे, मारुती बांडे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ बांडे, बंडू रांधवण, संदीप रांधवण, अविनाश रांधवण, सागर रांधवण, आदित्य रांधवण सामाजिक कार्यकर्ते श्रावण गायकवाड आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनेउपस्थित होते.
सरपंच बाळासाहेब खिलारी पुढे म्हणाले की, जाती-धर्मात द्वेष पसरत असताना महात्मा फुले यांचे समतेचे विचार समाजाला दिशादर्शक आहे. महात्मा फुले यांनी समतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी केली. समाजात समता आणि रुढी, परंपरा दूर होण्यासाठी त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून समाजात क्रांती घडवली असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा फुले यांनी त्याकाळात परिस्थितीशी संघर्ष करून समाजसुधारणेचे कार्य केले. शेतकरी, महिला, व बहुजन समाजाला सन्मान मिळण्यासाठी त्यांनी शिक्षणाने क्रांती घडवली. छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी मानून त्यांनी आधुनिक व क्रांतीकारी विचारांनी पुरोगामी महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने पायभरणी केली आहे.
राजेश भंडारी (महावीर उद्योजक समुहाचे प्रमुख)
जाती-धर्मात द्वेष पसरत असताना फुले यांचे समतेचे विचार समाजाला दिशादर्शक – सरपंच बाळासाहेब खिलारी

0Share
Leave a reply