Disha Shakti

शिक्षण विषयी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलठाण शाळेवर नवीन हजर झालेल्या शिक्षकांचा पालकांच्यावतीने सत्कार 

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी  / शेख युनूस : राहूरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथील चिखलठाण जिल्हा परिषद शाळा येथे एक ते आठ पर्यत वर्ग असून काही पदवीधर शिक्षकांची कमतरता हि भासत असल्यामुळे येथील काही युवक कार्येकर्ते आणि पालकांनी वेळोवेळी राहूरी येथील गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करत चिखलठाण येथील जिल्हा परिषद शाळेत पदवीधर शिक्षकांची मागणी केली होती.

नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक बदली प्रक्रियेत दोन पदवीधर शिक्षक श्री. नागटिळक सर, आणि श्री. सोन्याबापू आंबेकर सर यांची नेमणूक चिखलठाण शाळेवर करण्यात येताच येथील शिक्षक वृद कर्मचारी आणि पालकांनी संयुक्तपणे सत्कार केला. नागटिळक सर आणि आंबेकर सर यांनी शालेय विद्यार्थी पालकांच्या मनातील शिक्षणाची जी पोकळी निर्माण झालेली होती ती भरून काढण्याचे आश्वासन दिले.

यावेळी पालक वर्ग, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अल्ताफ शेख, भाऊ. भाऊ उदयोग समूहाचे मालक संतोष शेठ काळनर, शिवसेना अध्यक्ष सुभाष बाचकर,विनोद शेठ काळनर,शरद बागुल, आदिक ‘डोलनर,आनंदा टुले, सिकंदर सय्यद, अकबर सय्यद, रफिकभाई शेख, महादू काळनर,संदीप बर्डे,पीरण रहिमभाई सय्यद,आदी पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

याकार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक रोडे सर होते.तसेच राजाराम काकडे सर, रानपाटील बाचकर सर,संतोष गाडेकर सर, सारोकते सर, नागटिळक सर, आंबेकर सर यांच्या उपस्थितीत सन्मान, सत्कार आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश सारोक्ते सर यांनी केले,सूत्रसंचालन राजाराम काकडे सर यांनी केले तर आभार रानपाटील बाचकर यांनी मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!