बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी संभाजी शेळके दुगांवकर यांची निवड निवडीचे पत्र देताना भाजपा अनुसूचित जाती मोर्चा चे महाराष्ट्र प्रभारी राजु शिंदे,मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे,जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे,अनुसूचित जाती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र उपाध्यक्ष गंगाधर कावडे मान्यवरांचा उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.
शेळके हे मागील तिस वर्षापासून भाजपा चे निष्ठावंत कार्यकर्ते असून, ठक्करवाड साहेबांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले, बिलोली तालुक्यातील दुगांव चे माजी सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य तसेच तिन टर्म पासून अनुसूचित जातीचे तालुका अध्यक्ष असलेले संभाजी शेळके यांचा ग्रामीण भागात दांडगा संर्पक असल्यामुळे पक्ष श्रेष्ठींनी यांचावर सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे.
निवडीबद्दल धोंडू सावकार कोत्तावार, दत्तराम पिल्लेवार, बाबु पाटील, दत्ताहरी पाटील कागंठीकर, भाऊ पाटील कोळगांवकर, बाबु पाटील तोरणा, व्यंकटराव पाटील कुभरगाव, सतीश पा कदम, बालाजी पाटील कदम, मारोती यारावाड, पवन सोलगे, ईश्वर जाहुरे, किशनराव आंबेराय सर्वांनी अभिनंदन केले सर्व स्तरातून संभाजी शेळके यांचावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Leave a reply