Disha Shakti

राजकीय

छावा क्रांतिवीर सेनेच्या शेवगाव तालुकाध्यक्ष पदी दत्तात्रय वाघ यांची निवड

Spread the love

प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे  : संस्थापक अध्यक्ष मा.करणभाऊ गायकर यांच्या आदेशानुसार प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत व मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर पा.बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव भगवान सोरमारे यांच्या हस्ते शेवगाव तालुकाध्यक्ष पदी शेवगाव येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दत्तात्रय बबनराव वाघ यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त वाघ यावेळी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हंटले की ” संघटनेने टाकलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे.

आदरणीय करणभाऊ गायकर यांनी सुचविलेल्या ध्येय धोरण समोर ठेवत, सामाजिक कार्यात सहभागी राहत जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबध्द राहील तसेच शेतकऱ्यांच्या, समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणार आहे. युवक वर्गांची मोठी फळी उभा करणार असून येत्या काही दिवसांत शाखा उद्घाटन सोहळा आयोजित करणार आहे.”

यावेळी उपस्थित ज्ञानेश्वर तांगडे, उपसरपंच मोहन जाधव, कारभारी नवले, ज्ञानेश्वर कोरडे, गोविंद बावणे, शेषनारायण तांगडे, विनोद ससाणे आदीनी अभिनंदन केले….!


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!