अहमदपुर प्रतिनिधी / नंदराज पोले : नौकरदारांना वेतन आयोगा नुसार आणि महागाई निर्देषांका प्रमाणे मोबदला दिला जातो. शेतकऱ्याना वेगवेगळ्या अनुदानाबरोबरच अपत्तीनुसार मदत केली जाते परंतु शेतीवर काम करणाऱ्या मजुरांना महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत देण्यात येणारी मजुरी अत्यल्प आहे त्यात वाढ करून किमान सातशे रुपये करावी अशी मागणी वंचीत हक्क अंदोलनाच्या वतीने अहमदपुर तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदनाव्दारे केली आहे.
शेती क्षेत्रात तंत्रज्ञान व यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने भुमिहिन शेत मजुरांचा शेतीवरील रोजगार दिवसागणीक कमी होत चालला आहे.त्यामुळे शेतीवर अवलंबुन असणाऱ्या शेतमजुरांसाठी नैसर्गिक दुस्काळा बरोबरच यंत्राने होत असलेल्या कामामुळे त्यांच्याकरिता बारमाही दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. संविधानातील समानतेच्या तत्वानुसार शेतमजुरां प्रति नेहमीच भेदभाव केला गेला आहे. शासकिय कर्मचाऱ्यांबाबत स्वांतत्र्यानंतर आजपर्यंत सात वेळा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.
परंतु स्वांतत्र्यानंतर शेतमजुरा बाबतीत केवळ एकदाच अपवादाने आयोग लागु झाला त्यानंतर मात्र आयोग लागु झालेला नाही.शासकिय कर्मचारी आणि शेतमजुर यांच्या वेतनात किमान फरक ठेवुन रोजगार हमी योजनेवरील सध्या मिळत असलेली २७३ रुपये मजुरी अत्यल्प आहे ती वाढवुन किमान ७०० रुपये (सातशे ) करून शेतमजुरांना बेरोजगारी पासुन वाचविणे गरजेचे आहे.नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना हेक्टरी प्रमाणे मोबदला मिळतो मात्र त्याच जमिनीवर ज्यांचा रोजगार बुडाला त्या शेतमजुराला कोणताही मोबदला मिळत नाही. अशावेळी नैसर्गिक आपत्ती- दुष्काळी स्थितीत मजुरांना मोबदला मिळण्याची कायदेशीर तरतुद करावी.
यंत्राव्दारे करण्यात येणारी कामे बंद करून तालुक्यातील प्रत्येक गावात रोहयोचे कामे त्वरीत सुरु करावीत. रोहयोच्या कामावरील सध्या दिल्या जाणाऱ्या रोजगारात वाढ करून ती किमान सातशे रुपये करावी अदि मागण्याचे निवेदन निवेदन वंचीत हक्क अंदोलन महाराष्ट्र यांच्या वतीने अहमदपुर तहसीलदारा मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.या निवेदनावर वंचीत हक्क अंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष बालाजी शिंदे,अविनाश शिंदे, भागवत खलसे, मंगल श्रीमंगले,ललिता खलसे, वैजनाथ मुसळे,छबुबाई शिंदे,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांना किमान सातशे रुपये मजुरी द्या ; वंचीत हक्क अंदोलनाचे तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्याना साकडे

0Share
Leave a reply