विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने झापवाडी (ता.नेवासा) हेलिपॅड येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तेथून मोटारीने शनी शिंगणापूर येथे येऊन शनीदर्शन घेऊन उदासी महाराज सभा मंडपात अभिषेक केला. तसेच चौथार्यावर जाऊन तेल वाहीले.
दुपारची मध्यान्ह आरतीही राष्ट्रपतींनी केली आहे. तसेच दर्शन झाल्यावर पुढील नियोजीत दौर्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहे. राष्ट्रपती प्रथमच शिंगणापूरला येत असल्याने मोठी तयारी केली होती. बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर पासून सकाळपासूनच परिसराला छावणीचे स्वरूप आले होतेे. केंद्र व राज्याची गुप्तचर यंत्रणा, सुरक्षा विभाग, अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम तसेच शनैश्वर देवस्थानचे सर्व विभाग दिवस रात्र नियोजन करत होते.
यावेळी महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते.
Leave a reply