विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात नगर जिल्ह्यातील नगर उत्तरमध्ये कोपरगाव आणि राहाता तालुक्यांत एमआयडीसी मंजूर झाली आहे. कोपरगावमध्ये भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी एमआयडीसी मंजुरीचा जल्लोष केला. फटाके आणि पेढे वाटले. यानंतर पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आम्ही पाच वर्षांपासून ‘एमआयडीसी’साठी पाठपुरावा केल्याचा दावा केला. तशी पत्रकार परिषदेत कागदपत्रे दाखवली.
कोणत्याही नेत्यांनी याचे श्रेय घेऊ नये, असे म्हणत विवेक कोल्हे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार आशुतोष काळे यांचा नामोल्लेख करत हल्ला चढवला होता. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी यावरून विरोधकांना फटकारले आहे.आमदार काळे म्हणाले, “समोरच्यांचे खूपच अवघड आहे. खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे, अशी गत आहे. सर्वसामान्य कोपरगावकरांना कोण काम करतात आणि कोण स्टंटबाजी करतात, हे माहीत आहे. परंतु कोपरगाव आणि राहाता येथे एमआयडीसी मंजूर होणे खूपच गरजेचे होते.
महायुती सरकारने विकासाच्या दृष्टीने टाकलेल्या पाऊलांचे स्वागत करतो. आमच्या पाठपुरावा यश आले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेविषयी आभार मानतो”. विधानसभा 2019 च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात एमआयडीसी उभारणार असे वचन दिले होते. या वचनाची पूर्तता करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांची 14 मार्च 2020 मध्ये भेट घेतली. कोपरगाव मधील एमआयडीसी किती गरजेची आहे.
यावर चर्चा करत निवेदन दिले. यानंतर पुन्हा 27 जुलै 2023 मध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन एमआयडीसी संदर्भात पाठपुरावा केला. उद्योगमंत्री सामंत यांनी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोपरगाव आणि राहाता येथे एमआयडीसी मंजुरीचा निर्णय झाल्याची घोषणा झाल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगतिले.
कोपरगाव ‘एमआयडीसी’ मंजुरी आमच्याच पाठपुराव्यामुळे ; विवेक कोल्हेंच्या दाव्याने राजकारण तापले

0Share
Leave a reply