विशेष प्रतिनिधी : इनायत अत्तार : काही लोकांनी राजकारण हा आपला व्यवसाय बनविण्याचा प्रयत्न करू पाहत आहे, माणसांचा फक्त वापर करून घ्यायचा आणि सोडन देणे हीच पद्धत पूर्वी होती, मात्र सर्वसामान्य जनतेने आम्हाला समाजसेवेसाठी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवल्याने गेल्या ३५ ते ४० वर्षापासुन ग्रामीण भागातील अनेक रस्ते होत नव्हते ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून ते सोडवले असल्याचे प्रतिपादन आ. लहु कानडे यांनी विविध रस्ते कामांच्या उदघाटनप्रसंगी केले.
या कार्यकमाचे अध्यक्ष गोपीनाथ शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक अशोकनाना कानडे, अरुण पाटील, प्रविण काळे, मुठेवाडगावचे सरपंच सागर मुठे, हरिभाऊ बनसोडे, वळदगावचे सरपंच अशोक भोसले, सतिशराव बोर्डे,रमेश आव्हाड, नाऊरच्या नुतन लोकनियुक्त सरपंच सौ. नंदाताई अहिरे, उपसरपंच दिंगबर शिंदे, पं.स. माजी सदस्य विजय शिंदे,प्रतापराव देसाई,माणिकराव देसाई, चेअरमन भास्करराव शिंदे, सेवानिवृत्त शिक्षक सोन्याबापू शिंदे, युनुस पटेल सुरेश कोकरे, भाऊसाहेब खेमनर, शब्बीर पटेल,शाखा अभियंता श्री.कुलकर्णी, तमनर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना आ. कानडे म्हणाले आज देखील सुमारे ६ कोटी रस्त्याचे काम मार्गी लावले असुन त्यापैकी येथील तात्यांच्या वस्तीपासुन सावखेड गंगा रस्त्याचे काम होत आहे.
प्रमुख जिल्हा मार्ग मधुन सराला बेटाला जोडणारा रस्ता लवकरच पूर्ण होत आहे, बाभळेश्वर ते नेवासा हा मोठा रस्ता लोकप्रतिनिधी या नात्याने करू शकलो असल्याचे समाधान असुन बेलापूर चौपदरीकरणासाठी मा. मुख्यमंत्री यांच्या माध्यमातुन करू शकलो, इतर राजकारणी सारखे कोणाचे उणे दुणे काढत बसलो नाही तर विकास कामे करत आहेत,आणि पुढेही हे काम करत राहिल. शाळेची इमारतींची अवस्था वाईट झाली होती पत्रकार संदिप जगताप यांनी कल्पना दिल्याने मी स्वःत पाहणी केली असता मुलांचे भवितव्याची तळमळ पाहुन आमदार निधीतुन नाऊरच्या शाळेसाठी २ खोल्या तसेच Z.P. मधुन 2 खोल्या दिल्या असुन येथील जनावराचा दवाखाना, हरेगाव – नाऊर महत्वाचा प्रमुख रस्ते यासह गरजेचे प्रश्न सोडवले आहे. काही हौशी बहाद्दरानी माझ्या कामाचे उदघाटन इतरांच्या हस्ते केल्याचा नाव न घेता टोला लगावला. तसेच मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभे केले ते प्रामाणिक पणातुन उभे केले असल्याने त्यांच्या पाठीमागे सत्याची ताकद असल्याने ते यशस्वी होतांना दिसत आहे. पुढे बोलतांना आ. कानडे म्हणाले निवडणूका येतात – जातात मात्र एकोपा टिकला पाहिजे. नाऊरच्या ग्रामपंचायत मध्ये देखील प्रामाणिक नवे सदस्य निवडून आले असुन या सर्व नुतन कारभारी यांना शुभेच्छा देऊन गावाच्या विकासासाठी मी हवे ते सहकार्य करणार असल्याचे आश्वासन आ. कानडे यांनी दिले.
याप्रसंगी शिक्षक गोकुळ देसाई, वसंतराव शिंदे, सुरेश देसाई, अरुण शिंदे, विठ्ठल नानेकर, सुनिल शिंदे, नामदेवराव शिंदे, विठ्ठल शिंदे,प्रभाकर शिंदे, कैलास नांगळ, शिवाजी गुंड, कैलास शिंदे , किशोर नांगळ, जालिंदर दाणे, सुर्यभान शिंदे, संजय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, प्रितीश देसाई,संतोष वाघचौरे, प्रताप शिंदे, रामसिंग ( भाऊ ) गहिरे,अनिकेत अहिरे, किशोर अहिरे, शकिल पटेल, जगदिश शिंदे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेले ३५ वर्ष जे रस्ते होत नव्हते ते रस्ते निर्माण करून खऱ्या अर्थाने सर्वसामान्याची अडचण सोडवली – आमदार कानडे

0Share
Leave a reply