संगमनेर प्रतिनिधी / युनूस शेख : संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर काही वारकरी जखमी झाले असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक-पुणे महामार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघातातील मृतांची नावेही समोर आली आहे.
या अपघातात बाळासाहेब अर्जुन गवळी, बबन पाटीलबा थोरे, भाऊसाहेब नाथा जपे, ताराबाई गंगाधर गमे अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी येथील श्री महंत काशीकानंद महाराज यांची साई पालखी दिंडी देवाची आळंदी येथे जात होती.
कंटेनरला चालकाला डुलकी लागल्याने त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यानंतर हा कंटेनर थेट दिंडीमध्ये घुसला. या अपघातात ४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला. तर ८ वारकरी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
या अपघातातील जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या वारकऱ्यांवर उपचार सुरु आहेत. संगमनेर तालुक्यातील घारगावात अपघात घडला आहे. शिर्डीतून आळंदीकडे जाणाऱ्या पायी पालखीचा अपघात झाला आहे. नाशिक-पुणे महामार्गावर हा अपघात झाला आहे.
तत्पूर्वी, घारगाव येथील नांदूर खंदरमाळ फाटा सातवा मैल येथे झालेल्या अपघातातील जखमींना तातडीने मदत करण्याच्या सूचना माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी , प्रशासनाला केल्या. त्यानंतर त्यांनी तातडीने मदत पोहोचवली.
Leave a reply