राहुरी तालुका प्रतिनिधी : ज्ञानेश्वर सुरेशे
महाराष्ट्रात एक भलताच असा प्रकार समोर आलेला असून लग्न झाल्यानंतर आठवडाभरातच नववधु हिने सोन्याचे दागिने घेऊन पलायन केलेले आहे . छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील डाक पिंपळगाव येथील ही घटना असून नववधू सोबत चार जणांच्या विरोधात विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील एका एजंटला या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे
उपलब्ध माहितीनुसार , विजय देवीचंद गांधी ( वय 37 असे राहणार सोनई तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर ) असे या एजंटचे नाव असून मीरा अशोक पंडित ( वय 27 राहणार छत्रपती संभाजीनगर ) असे नवविवाहित तरुणीचे नाव आहे. लग्नाच्या आठ दिवसानंतरच घरातील सोन्याचे दागिने घेऊन ती फरार झालेली होती . मीरा पंडित , एजंट विजय गांधी , शारदा चव्हाण , पुंडलिक चव्हाण ( राहणार वाळूज ) या चार जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
वैजापूर तालुक्यातील डाक पिंपळगाव येथील तरुणाचे विजय गांधी यांनी लग्न जमवलेले होते . मीरा पंडित या तरुणीसोबत फिर्यादी व्यक्तीचे लग्न 20 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथे लावून देण्यात आले. लग्नासाठी म्हणून मुलीकडच्या लोकांनी दोन लाख रुपयाची रक्कम घेतली मात्र लग्न झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसात दागिने घेऊन मीरा ही पळून गेली. विरगाव पोलीस ठाण्यात त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
Leave a reply