Disha Shakti

सामाजिक

राज्य युवा ग्रामीण पत्रकार संघाची राहुरीत बैठक संपन्न*.

Spread the love

      युनूस शेख अहमदनगर प्रतिनिधी – 

              शहर व ग्रामीण पत्रकारांच्या बरोबरच समाजातील सर्वसामान्य घटकांच्या विविध समस्यांचे अवलोकन करत त्या मार्गी लावण्यासाठी ग्रामीण पत्रकारांचे मोठे संघटन राज्य अध्यक्ष गणेश कचकलवार यांचे नेतृत्वात निर्माण होत असून रविवारी राहुरी तालुक्यातील पत्रकारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुका अध्यक्ष अशोक मंडलिक यांनी दिली आहे 

          याबाबत प्रसिद्ध पत्रकात त्यांनी म्हटले आहे की पत्रकार हा समाजाचा आरसा आहे त्याच्या प्रतिबिंबातून सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू नेहमीच राहिला नि राहणार आहे ग्रामीण भागातील पत्रकारांना नेहमीच या ना त्या कारणाने समस्यांचा पाठलाग करावा लागतो त्याची दखल प्रशासन कधीच घेत नाही म्हणूनच आज ग्रामीण जनतेचा आवाज थांबलेला आहे ग्रामीण पत्रकारांना संरक्षण मिळाले तर जनतेचा आवाज लोकप्रतिनिधी व प्रशासनापर्यंत पोहोचून या घटकांना न्याय देण्याच्या सेवाव्रती भुमिकेत हा पत्रकार राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे 

          रविवारी झालेल्या बैठकीसाठी नाशिक विभाग अध्यक्ष शरद तांबे, जिल्हा अध्यक्ष महेश भोसले, जिल्हा प्रमुख सल्लागार आदरणीय प्रभंजन कनिंगध्वज, जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले, अहमदनगर शहराध्यक्ष अशोक तांबे, जिल्हा सह.सचिव रमेश बोरूडे, जिल्हा निमंत्रक राजेंद्र म्हसे यथोचित मार्गदर्शन करत पत्रकारांना न्याय मिळवून देऊ आणि कुठल्याही पत्रकारावर आर्थिक आणि मानसिक त्रास झाल्यास आपली संघटना ही त्या पत्रकाराच्या मागे खंभीर पणे उभी राहील आणि ग्रामीण भागातील पत्रकार हा वंचित राहणार नाही अशी ग्वाही दिली.

       . राज्य युवा ग्रामीण पत्रकारांना नियुक्ती पत्र आणि ओळख पत्र देण्यात आले.

 

           बैठकीस यावेळी उपस्थित अशोक राव मंडलिक,सचिव रमेश जाधव(आर. आर. जाधव ),उपाध्यक्ष राजेंद्र पवार, शहराध्यक्ष समीर शेख,  राजेंद्र साळवे, रमेश खेमनर, मधुकर म्हसे, मनोज साळवे,लक्ष्मण पटारे, कमलेश विधाते, युनुस शेख, जावेद शेख, दिपक मकासरे, अनिल तारडे, दत्ता जोगदंडे,वसंत भोसले,पप्पू डफळ, सोमनाथ वाघ,नाना जोशी आदी पत्रकार उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!