पुणे प्रतिनिधी : किरण शा. थोरात
दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतची दि.4डिसेम्बर रोजी ग्रामसभा पार पडली या सभेत सर्वानुमते गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. जालिंदर बबन घुले यांची महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्ष पदी तर महेश सुरेश बोराटे यांची उप अध्यक्ष निवड करण्यात आली.
माजी गृह मंत्री स्व. आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून पोलीसांवारील ताण कमी व्हावा ह्यासाठी निर्माण झालेल्या गृहखात्याच्या संबंधित ग्रामस्तरावरील ह्या समित्यानी आजपर्यंत लहान मोठे तंटे गावातच सोडवून अनेक गावे तंटामुक्त झाली आहेत.
नांदूर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने अध्यक्ष व उप अध्यक्ष यांच्या सन्मान कारण्यात आला, यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक, युवा कार्यकर्ते, व समस्त ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थिती होते.