राहुरी शहर प्रतिनिधी / नाना जोशी : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी 67 व्या महापरिनिर्वाण दिनी राहुरी येथील जय भीम मित्र मंडळ, राजवाडा राहुरी व धम्मदिप युवा मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे एक लोकचळवळ राबविण्यात येणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी आपण फुले अर्पण न करता “एक वही एक पेन” आहे अर्पण करुयात.
अल्पकाळात कोमजणारी हार फुले अर्पण करण्यापेक्षा विद्यार्थींचेय जीवन फुलवणारी वही पेन अर्पण करुया आणि महामानवाला क्रांतिकारी पद्धतीने अभिवादन करुया.त्यामुळे 6 डिसेंबर रोजी राहुरी शहरातील राजवाडा येथील समाज मंदिरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करायला येताना कमीत कमी “एक वही एक पेन” घेऊन या.किंवा तुमच्या इच्छा प्रमाणे तुम्हीही कितीही वही आणि पेन देऊ शकता.या अभियानात सर्वांनी सामील व्हावे, आणि सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीस हातभार लावावा.असे आवाहन आयोजकांनी केले.
दिनांक 6 डिसेंबर, ठिकाणी -समाजमंदिर राहुरी.वेळ-सकाळी9:00 वा.या ठिकाणी वही व पेन स्विकारण्यात येतील.अधिक माहितीसाठी… 1) अजिंक्य शिंदे -9730717080. 2) अजय साळवे -9762209386. 3) भुषण साळवे -9689688985. 4) अनुकरण साळवे -9527584986. 5) अक्षय लोंढे -7744829452. यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.
Leave a reply