धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : चाळीस वर्ष तेर ग्रामपंचायत वर एक हाती सत्ता असलेले माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील व तुळजापूर विधानसभेचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे तेर येथील राहते घर घाणीच्या विळख्यात
धाराशिव तालुक्यातील तेर ग्रामपंचायत ने स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा करून देखील गावातील सर्व ठिकाणी घाणीचे साम्राज्य असून दुर्गंधी पसरल्यामुळे साथीच्या डेंग्यू मलेरिया चिकन गुनिया सारख्या आजाराने फैलाव घातला आहे तेर ग्रामपंचायत च्या निष्क्रिय कारभारामुळे काही दिवसापूर्वीच एका निष्पाप बालकाचा डेंगू सदृश्य आजाराने मृत्यू झाला आहे यामुळे तेर मधील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
झोपीचे सोंग घेतलेल्या ग्रामपंचायत प्रशासनास जाग कधी येणार? निवडणुकीत आश्वासनांचा भडीमार करणाऱ्या लोकप्रतिनिधीस ग्राम स्वच्छतेचा विसर पडला आहे यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे…
तेरमध्ये घाणीचं साम्राज्य ग्रामपंचायतचं दुर्लक्ष ; भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे राहते घर घाणीच्या विळख्यात

0Share
Leave a reply