राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी तालुक्यातील बारागांव नांदूर येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे महामानव आणि भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्यास बारागाव नांदूर चे नवनिर्वाचित सरपंच प्रभाकरराव गाडे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर माजी सरपंच निवृत्ती भाऊ देशमुख ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर न्यानेश्वर आघाव , ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी गोसावी साहेब ग्रामपंचायत सदस्य हबीब भाई देशमुख भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाप्रमुख दगडू पवार रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव रिपब्लिकन सेनेचे तालुकाप्रमुख विनोद पवार यांच्या हस्ते मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी त्रिशरण पंचशील दिले यावेळी चंद्रकांत जाधव, विनोद पवार ,प्रभाकर गाडे पाटील, डॉक्टर ज्ञानेश्वर आघाव यांची भाषण झाली
अभिवादन सभेसाठी विलास पवार गौतम पवार अशोक धनवडे कृषी अधिकारी साळवे साहेब, शिवसेना नेते बाळासाहेब गाडे ,माजी उपसरपंच जिल्लुभाई पिरजादे ,सचिन कोहकडे, संतामन शिंदे, शिवाजी मंडलिक, अशोक शिरसागर ,संजय बर्डे, बाळासाहेब खरात, असे अनेक मान्यवर उपस्थित होते
बारगाव नांदूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन सभा संपन्न

0Share
Leave a reply