Disha Shakti

सामाजिक

जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धात विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडीयम स्कूल भिगवण प्रथम क्रमकाचे यश संपादन

Spread the love

इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे  : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे आयोजित पुणे जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा 2023-24 मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी शहा सांस्कृतिक भवन, इंदापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता शहा संस्कृती भवन हे दिवसभर खेळाडूंनी गजबजून गेले होते.

या स्पर्धेमध्ये विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडीयम स्कूल भिगवनच्या 9 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या मध्ये प्रथम क्रमांक मिळवून सोलापूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरीय शालेय किकबाॅक्सिंग स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू 1) आयुष विधाते 28 किलो खालिल वजनगटात प्रथम क्रमांक 2) स्वरूप नांदे 32 किलो खालिल वजनगटात प्रथम क्रमांक 3) श्रेयश बंडगर 42 किलो खालिल वजनगटात प्रथम क्रमांक  4)सार्थक ताकमोगे  47 किलो खालिल वजनगटात प्रथम क्रमांक 5) शिवतेज विधाते 37 किलो खालिल वजनगटात तृतीय क्रमांक 6) आकांश सिंग 52 किलो खालिल ‌वजनगटात तृतीय क्रमांक तसेच सक्षम सातव, प्रज्वल वारगड, सार्थक सुतार यांनी सहभाग नोंदवला

सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट रित्या यश संपादन केल्याबद्दल विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडीयम स्कुल चे अध्यक्ष श्री बापूराव थोरात सचिव श्री विजय भैय्या थोरात स्कुल च्या प्रिंसिपल मॅडम सौ.वंदना थोरात तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे विश्वस्त यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे व‌ क्रिडा शिक्षक यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या क्रिडा शिक्षक गणेश घुले सर यांचे सर्व खेळाडूंना प्रशिक्षण लाभले


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!