Disha Shakti

राजकीय

मराठा आरक्षण, दारूबंदी, ज्युनिअर कॉलेजच्या प्रश्नासह शेतकऱ्यांना गावठाणमधुन पाणी परवानगीच्या प्रश्नावर गाजली नाऊरची ग्रामसभा

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी / गणेश राशिनकर : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील गेल्या अनेक वर्षांनंतर तसेच नुतन सरपंच/ उपसरपंचासह सदस्याच्या निवडीनंतरची पहिलीच ग्रामसभा गावातील स्मशानभुमी, दफनभुमी सह गावातील कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक न करता पाणी उपसा परवानगी रयतच्या विद्यालयात ११ वी व १२ वी चे वर्ग सुरू करण्याच्या मागणीसह इंदिरानगर मधील दुर्लक्षित पाण्याची टाकीच्या प्रश्नावर विशेष गाजली.

या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच नंदाताई सुनील अहिरे ह्या होत्या तसेच उपसरपंच दिंगबर शिंदे, ग्रामसेवक प्रदिप ढुमणे, सदस्य सौ स्वाती संतोष वाकचौरे, सौ. हिराबाई भानुदास भवार, सौ. शिल्पा रामसिंग गहिरे, प्रितिश देसाई, सौ. अनिता प्रताप शिंदे, सौ. नंदा विकास त्रिभुवन, अनिकेत अहिरे आदी सदस्यांसह कृषी सहायक अनिलकुमार शेजुळ, आरोग्य उपकेंद्राचे प्रतिक ब्राम्हणे, आशा सेविका पुनम वाघचौरे, सौ. लता शिंदे, सौ. वैशाली शिंदे कर्मचारी किशोर देसाई, किशोर त्रिभुवन, उपस्थित होते.

ग्रामसभेच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगत दलितवस्ती, शिंदे वस्ती रस्ते, अंडरग्राऊड गटारी, वृक्ष लागवड व जाळी बसवणे, जलजीवन योजनेचे काम पूर्ण करणे, डास प्रतिबंधक फवारणी करणे आदी कामांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी गणेश नानेकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याचा ठराव मांडला तर अशोक गायकवाड यांनी गावठाण मधुन मागेल त्या शेतकऱ्याला पाणी उपसा परवानगी देऊन गावात हरितक्रांती निर्माण करण्यासह स्मशानभूमी व दफनभूमीसाठी जागा कुठे गेली याची चौकशीची मागणी केली.

तर भानुदास भवार यांनी रयतची शाळा असुन येथे ज्युनिअर कॉलेज अद्याप का होऊ शकले नाही असा सवाल करत कॉलेजची मागणी केली. संजय गायके यांनी टपरीधारकांना प्राधान्याने गाळे देण्याची मागणी केली, शिवाजी गुंड यांनी आम्ही गावचे रहिवाशी व मतदार असुन नदीच्या पलीकडे राहत असल्यामुळे आम्हाला ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा होत नसुन केंद्र सरकारच्या हर घर जल या जलजीवन योजनेतुन पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. गणेश त्रिभुवन व पप्पू त्रिभुवन यांनी इंदिरानगर मधील पाण्याची टाकीची अवस्था वाईट झाली असुन ही टाकी कधी पडेल याची शाश्वती नसुन झाकण नसल्याने पक्ष्याची घाण, अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असुन या टाकीचे त्वरीत निर्लेखन करून जलजीवन योजनेत वाढीव निधीतुन हे काम करण्याची मागणी केली. यासह घरकुलामधील उडालेले नावे पुन्हा समाविष्ट करणे, गटारीमध्ये शौचालयाचे पाणी न सोडणे, गटारी स्वच्छ करणे, फळबाग लागवड, प्लॉस्टिक अस्तरीकरण, कपाशी अनुदान, मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त, आ.भा कार्ड, आरोग्यसेविका मिळणे आदीसह अनेक विषयाचे ठराव खेळीमेळीच्या वातावरणात संमत करण्यात आले.

याप्रसंगी प्रतापराव देसाई, वसंतराव शिंदे, माणिकराव देसाई, आप्पासाहेब राशिनकर, अरुण शिंदे, बबलू पटेल, अशोक गायकवाड, सोमनाथ गहिरे, किशोर अहिरे, शिक्षक गोकुळ देसाई, सुरेश देसाई, भाऊ गहिरे, विजय गायकवाड, युनस पटेल, जावेद पटेल, संतोष वाघचौरे,रियाज पटेल, कैलास शिंदे, संदिप देसाई,एकनाथ गायकवाड, किशोर नांगळ,सुरज गायकवाड, उद्धव शिंदे, शरद देसाई, पत्रकार संदिप जगताप आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घरकुल योजने मधील नावे उडाली कशी ? आ. कानडेना शिष्टमंडळ भेटणार
नाऊर ग्रामपंचायतकडून गावातील घरकुलासाठी पात्र असणारे कुंटूबाचे प्रस्ताव पाठवण्यात आले.मात्र यामध्ये “ड” यादीमध्ये असणाऱ्या अनेक पात्र कुंटूबांचे नावे कोणत्या कारणास्तव अपात्र करण्यात आले. त्या कुंटुबाना तसा पंचायत समितीकडून पत्रव्यवहार का करण्यात आला नाही याची चौकशी करण्याची गरज असुन यासंदर्भात शिष्टमंडळ आमदार लहु कानडे यांची भेट घेणार असल्याचे समजते


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!