मुंबई कांदिवली / भारत कवितके : बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता कांदिवली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्व साधारण रुग्णालयाच्या आवारात असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्ण पुतळ्या समोर पंचशील प्रतिष्ठान ट्रस्ट व भारतीय जनता पार्टी यांच्या मार्फत विनम्र अभिवादनचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्ण पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्य, समता, बंधुता, या सारखी प्रेरणादायी विचार सरणी समाजाला देऊन देशातील सर्वात मोठी लोकशाही रुजविणारे विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, उध्दारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, आरक्षणाचे जनक, अर्थवेत्ते,सर्व शास्त्रांमध्ये प्राविण्य मिळवलेले,अशा या महामानवाला त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
या विनम्र अभिवादन प्रसंगी या ठिकाणी आमदार मनिषा चौधरी, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, मा.नगरसेवक व मंडळ अध्यक्ष बाळा तावडे, मा.नगरसेवक कमलेश यादव, मा.नगरसेविका प्रतिभा गिरकर, मा.नगरसेविका प्रियंका मोरे, पंचशील प्रतिष्ठान ट्रस्ट चे संजय बावीस्कर, गजानन गवई, सुनील कदम, महिला अध्यक्षा रेश्मा टक्के, योगेश पडवळ, पत्रकार साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कामगार, सुरक्षा रक्षक,व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.
कांदिवली मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादनचा कार्यक्रम संपन्न.

0Share
Leave a reply