राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : ब्राह्मणी जिल्हा परिषद शाळेत वारंवार खोडसाळ पणाच्या घटना घडत आहे. गावाचं उद्याचं भविष्य घडविणाऱ्या शाळेत सरस्वतीच्या मंदिरात वाढत्या प्रकाराबद्दल पालक शिक्षण प्रेमी ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
यापूर्वी पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नळांची तोडफोड, स्वयंपाक गृह परिसरात विस्टा टाकणे, किचन शेडच्या भिंतीवर अश्विल शब्दात लिखाण करणे, शाळा परिसरात मद्यपान करणे अशा एक ना अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महावीर चेगडिया यांनी या प्रकरणी वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत माहिती दिली.
जिल्हा परिषदेच्या चारी बाजूने ऑल कंपाउंड आहे. तरी काही विघ्न संतोषी लोक शाळा परिसरात असे कृत्य करतात ही बाब दुर्देवी आहे. सदर ऑल कंपाऊंडवर तीन चार फूट तार कंपाउंड करू. सदर प्रश्न उद्याच्या बैठकीत मांडण्यात येईल. शाळा परिसरात गैर कृत्य करताना कोणी आढळल्यास संबंधितावर पोलीस प्रशासनामार्फत कारवाई केली जाईल. असा इशारा सरपंच सौ.सुवर्णा बानकर यांनी दिला आहे.
ब्राम्हणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील किचनचा दरवाजा मध्यरात्री तोडण्याचा प्रयत्न

0Share
Leave a reply