सोलापूर प्रतिनिधी / बिरु खुटेकर : सोलापुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका पोलिसाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो इतक्यावरच थांबला नाही तर सोशल मीडियावर स्वतःला सिंघम म्हणत भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे.
या घटनेनंतर सोलापूर पोलिस विभागात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसा, वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलले आहे. विकास गंगाराम कोळपे असे स्वत:वर गोळी झाडणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोलापुरात कारागृहात नियुक्त असलेल्या विकास गंगाराम कोळपे या पोलिस शिपायाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. 34 वर्षीय विकास गंगाराम कोळपे यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. कर्तव्यावर हजर असताना संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास जवळ असलेल्या रायफलने कोळपे यांनी स्वतःवर गोळी झाडली. तो इतक्याचवर थांबला नाही तर सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे.
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. स्वतःला सिंघम म्हणत त्याने भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे. विकास गंगाराम कोळपे यांना उपचारासाठी गंभीर जखमी अवस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अतिशय गंभीर असल्यामुळे त्यांना आता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
विकास गंगाराम कोळपे हे पुण्यातील देवाची आळंदी येथील मूळचे रहिवाशी आहेत. त्यांच्या घरी आई, वडील, भाऊ, पत्नी आणि अडीच वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. विकास यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने सोलापूर पोलिसांमध्ये एकच खळबळ माजली आहे.
Leave a reply