राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली आहे. पुढील सहा महिन्यांसाठी ही निर्यात बंदी वाढविल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरुद्ध शेतकरी आक्रमक झाले असून कांदा निर्यात बंदी उठवावी या मागनीसह अन्य मागण्यासाठी नगर- मनमाड महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात आज हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी देखील सहभागी झाले होते. या आंदोलनात प्रामुख्याने कांदा निर्यात बंदी मागे घ्या, इथेनॉल उत्पादनावर घातलेली बंदी मागे घ्या, दुधाला भाव द्या. या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांसह स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होत महामार्ग अडवला. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून नगर- मनमाड महामार्गावर राहुरी बाजार समितीसमोर रस्ता अडवला. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर रस्त्यावर भजन गात सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
राहुरी येथे भजन गात शेतकऱ्यांनी अडविला नगर मनमाड महामार्ग ; कांदा निर्यात बंदी उठविण्याची मागणी

0Share
Leave a reply