Disha Shakti

सामाजिक

माहिती व कायदा वृत्तपत्राच्यावतीने इनायत अत्तार उत्कृष्ट प्रतिनिधी पूरस्काराने सन्मानित

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी / गणेश राशीनकर :  श्रीरामपूर येथे रविवार दि.10 डिसेंबर रोजी व माहिती व कायदा वृत्तपत्राच्या वर्धापनदिनानिमित्त संपादक मंडळाच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये माहिती व कायदा वृत्तपत्र व दिशाशक्ती मीडिया मध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ पत्रकार श्री.इनायत भाई अत्तार यांना उत्कृष्ट प्रतिनिधी पुरस्काराने जय बाबाचे संपादक श्री.मनोज आगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सदरील कार्यक्रम माहिती व कायदा वृत्तपत्राचे संपादक अस्लम सय्यद सर व उप संपादिका विजयाताई बारसे यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार बांधव उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!