राहुरी शहर प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी शहरातील बाल विद्यामंदिर या शाळेमध्ये आंतरशालेय क्रीडा स्पर्धेला नुकतीच सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक श्री गुलाब तुकाराम मोरे यांचे हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांचे खो-खो कबड्डी या खेळाचे सामने झाले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून व एक दर्जेदार खेळाडू तयार करण्यासाठी वरील सामन्यांचा लहानपणापासूनच सराव होणे गरजेचे आहे. सामन्यांमध्ये पंच म्हणून श्री राठोड बाळासाहेब, श्री कवडे शिवाजी यांनी कामकाज पार पाडले.
यावेळी श्री हेंद्रे दत्तात्रय श्री पवार नानासाहेब, श्रीमती पवार रूपाली, श्रीमती साखरे सविता श्रीमती आढाव अलका श्रीमती जगताप सविता श्रीमती बार्से सुनिता, श्रीमती काळे नंदा, श्रीमती शेटे सुनीता, श्रीमती पाटोळे जयश्री, श्रीमती बाचकर संगीता, श्रीमती बर्डे मीना, श्री संदीप जंगम यांनी मोठे योगदान दिले. स्पर्धेचे समालोचन श्री संदीप रासकर सर यांनी केले.
Leave a reply