श्रीरामपूर प्रतिनिधी / गणेश राशीनकर : सुप्रीम कोर्टाने आदेश करून सांगितले आहे की एक महिन्याच्या आत सर्व दुकानदाराने मराठी भाषा मध्ये पाट्या लावावेत अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल या देशाचे श्रीरामपूर मध्ये त्वरित पालन व्हावे यासाठी श्रीरामपूर येथील प्रांताधिकारी नगरपालिका शहर पोलीस स्टेशन यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूरच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे मनाली की मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकून राहण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध स्वरुपाचे उग्र आंदोलन करुन संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. तर काही पदाधिकार्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती याची दखल घेऊन सुप्रिम कोर्टाने केंद्र व राज्य सरकारला आदेश दिले आहे की, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दुकानावर मोठ्या अक्षरात ठळकपणाने दिसेल असे मराठी भाषेत बोर्ड लावण्यात यावे.
या आदेशाचे संपूर्ण राज्याने तसेच प्रशासकीय अधिकार्यांने, सर्व दुकानदाराने पालन करावे असे आदेश असतांना आपल्या नगरपालिका हद्दीतील सर्व दुकानदारांना आपण नोटीस देवून त्यांना सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचे पालन करुन दुकानावर मराठी भाषेत मराठी पाट्या लावण्याचे आदेश करावे व जे दुकानदार सुप्रिम कोर्टाचे व आपल्या आदेशाचे पालन करणार नाही अशा दुकानदारावर कडक कायदेशीर कारवाई तात्काळ करण्यात यावी.
व आमच्या निवेदनाची दखल घेऊन येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये श्रीरामपूर शहरातील सर्व दुकांनावर मराठी पाट्या न लावणार्या दुकानदारावर कायदेशीर कारवाई न झाल्यास आपण दुकानदारांना पाठीशी घालून आपण सुद्धा सुप्रिम कोर्टाचे आदेशाचे पालन करत नाही असे समजून आपल्यासह दुकानदारांवर कारवाई व्हावी यासाठी आपल्या कार्यालयासमोर मनसे स्टाईलने तिव्र आंदोलन करण्यात येईल.मग होणार्या परिणामास आपण स्वत: जबाबदार राहाल याची नोंद घेण्यात यावी. असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, डॉक्टर संजय नवथर जिल्हा सचिव,
उपजिल्हाध्यक्ष विलास पाटणी, तालुकाध्यक्ष गणेश दिवसे,शहराध्यक्ष सतिश कुदळे,बबन वाकडे तालुका संघटक,भास्कर सरोदे तालुका सचिव, अमोल साबणे तालुका सरचिटणीस, कुणाल सूर्यवंशी विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष, यश जराड विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष,निलेश सोनवणे शहर संघटक, नितीन जाधव शहर सरचिटणीस, अभिजीत खैरे तालुका उपाध्यक्ष, शहर उपाध्यक्ष अंकुश कुमावत, सचिन कदम, लखन खुरे, संतोष धुमाळ, बाळासाहेब ढाकणे, संदीप विशंभर, मारुती शिंदे, सुनील करपे, चेतन दिवटे, सुमित गोसावी, ज्ञानेश्वर काळे, महेश पवार, विकी परदेशी, मच्छिंद्र हिंगमिरे, आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचे पालन करून सर्व दुकानदारांनी मराठी भाषेतच पाट्या लावाव्या : मनसे जिल्हाध्यक्ष बाबा साहेब शिंदे

0Share
Leave a reply