शेख युनूस अहमदनगर*/…
राहुरी तालुक्यातील दरडगांव येथील मायराणी येथे होत असलेल्या ग्रामीण रस्ते विकास अंतर्गत रस्त्याचे काम सुरु असून ते अतिशय निकृष्ट आणि कमी दर्जाचे होत असल्याचे लक्षात येताच येथील लोकनेते आणि ग्रामपंचायत सदस्य पै. उत्तमराव बर्डे यांनी येथील निकृष्ट कामाचे बिल अदा न करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. . . दरड गांव येथील मायारानी येथील कामाला ठेकेदाराने सुरुवात केली असून येथे वापरातील खडी ही प्रमाणापेक्षा जास्त जाड आणि निकृष्ट असल्यामुळे हे काम फक्त दिसत असून या निकृष्ट कामाची सकोल चौकशी व्हावी आणि मायराणी रस्त्याचे काम हे पूर्ण योग्य परिपूर्ण उच्च प्रतीचे झाल्याशिवाय प्रशासनाने या कामाचे बिल अदा करू नये अशी मागणी पै. उत्तम बर्डे यांनी केली आहे. . .सन २०२२ ते २३ चे ३०५४ ग्रामीण रस्ते विकास अंतर्गत रस्त्याच्या कामाचा तांत्रिक मान्यता आदेश मिळाला.मायराणी येथील जोड रस्ता आणि रस्ता मजबुती करणासाठी सुमारे ३० लाखाचा निधी मंजूर झाला. . . मायराणी येथील रस्त्याचे काम हे ठेकेदार आपल्या मनमानी कारभार करून निकृष्ट काम करून जनतेची दिशाभूल करत आहे आणि प्रमाणापेक्षा जास्त जाड खडी वापरून निकृष्ट कामे करून शासनाची आर्थिक लूट करीत आहे. . . मायारानी येथील रस्ता कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन केले जाईल अशी मागणी पै. उत्तम बर्डे आणि मायराणी येथील ग्रामस्थ यांनी केली आहे.
Leave a reply