राहुरी शहर प्रतिनिधी / नाना जोशी : अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या मांडण्यासाठी गेल्या 4 डिसेंबर पासून कामबंद आंदोलन अद्यापही सुरूच आहे.दरम्यान काल राहुरी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढत तहसील कार्यालय समोर ठिय्या आंदोलन केले.15 डिसेंबरला राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचा मोर्चा नागपूर येथे धडकणार असल्याचे मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या संघटनेच्या अध्यक्षा मदिना शेख व शरद संसारी, राजेंद्र बावके, जीवन सुरुडे यांनी म्हटले आहे. मानधन नको वेतन जाहीर करा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या.
यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरातील आंदोलन सुरू केले आहे. यामुळे अंगणवाडीतील बालकांना मिळणाऱ्या पोषण आहारावर परिणाम झाला आहे. या आंदोलनादरम्यान आज राहुरी तहसील कार्यालयावर शेकडो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मोर्चा काढत सरकार विरोधात आठ दिवसापासून काम बंद जोरदार घोषणाबाजी केली. अंगणवाडी सेविकांनी गेल्या सेविका – मदतनीस कर्मचारी युनियन अधिवेशन सुरू असतानाही सरकार अंगणवाडी सेविकांच्या मागण्या बाबत तोच भूमिका घेत नसल्याने 15 डिसेंबरला राज्यभरातल्या अंगणवाडी सेविका नागपूर येथे निदर्शने करणार आहेत. त्यानंतर ही प्रश्न मार्गी न लागल्यास मंत्र्यांना विरोध करण्यासह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
Leave a reply