प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय मुळाणे शाळेत स्काऊट गाईड अंतर्गत आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष मा.दिलीप नाना रौंदळ हे होते.प्रसंगी आबा अहिरे सरांनी कार्यक्रमाची सुरुवात प्रस्तावना करून केली.तसेच आनंद मेळाव्याचे महत्त्व काय आहे हे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम.एम.एम कसबे मॅडम यांनी करून दिली. तसेच याप्रसंगी मुळाणे गावाचे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच तसेच सर्व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. सर्वच मान्यवरांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थ व भाजीपाला विक्रीसाठी आणला होता.आनंदाच्या वातावरणात विद्यार्थी वस्तु खरेदी विक्री करताना दिसत होते.शेवटी अध्यक्षीय भाषणात मा.दिलीप नाना यांनी सर्वाचे अभिनंदन करत विद्यार्थीचे कौतुक केले.तसेच आपल्या मनोगतातून नाना यांनी सांगितले की आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञानात भर पडेल तसेच शिक्षणाबरोबर विविध उपक्रम प्रत्येक शाळेत राबविणे गरजचे आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक शेवाळे सर निकम सर सावकार मॅडम शेवाळे मॅडम जगताप मॅडम भामरे मॅडम बच्छाव मॅडम कदम मॅडम संदिप मामा सागर मामा यांनी प्रयत्न केले.कार्यक्रम सुञसंचालन गोकुळ वाघ यानी केले तर आभार दिपाली सावकार यानी मानले.
Leave a reply