राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी शहरातील जोगेश्वरी आखाडा येथील शेतात ऊस तोडणी करत असताना बिबट्याचे चार नवजात बछडे आढळल्याची घटना जोगेश्वरी आखाडा हद्दीतील राहुरी एमआयडीसी परिसरात येथे उघडकीस आली.नवजात बछडे असल्याने आसपास बिबट्याचा संचार असल्याने शेतकर्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.गेल्या आठवड्यात जोगेश्वरी आखाडा येथील शेतकरी सचिन हारदे यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याची बछडे दिसून आले होते.मात्र त्यावेळी ऊसतोडणी थांबविण्यात आली.
विठ्ठल भाऊराव शेटे यांच्या सर्वे नंबर 264 मध्ये ऊसतोड कामगार तोडणी करत असताना बिबट्याचे 4 बछडे कामगारांना दिसली. त्यांनी विठ्ठल शेटे यांना ही माहिती दिली.त्यानंतर त्यांनी वनविभागास कळवले असता वनविभागास खबर दिली.वनविभागाचे वामन लांबे, ताराचंद गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन ,4 बछडे ताब्यात घेतले आहेत. दरम्यान 4 बछडे असल्याने या ठिकाणी मादीचा वावर असून शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे.
वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी वनविभागस केली आहे.दरम्यान उसाचे शेत हे बिबट्याचे प्रमुख निवासस्थान झाले असून गेल्या काही दिवसांत ऊस तोडणी करताना बिबट्याचे बछडे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे ऊस तोड मजुरांनी ऊस तोडणी करताना काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a reply