राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी तालुक्यातील आगामी लोकसभा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनूषंगाने 223 राहुरी विधानसभा मतदार संघामधील नोंदणी प्रारुप मतदार यादी, मतदान केंद्रांची माहिती नविन ईव्हीएम तसेच व्हिव्हिपॅट जनजागृती मोहीम, बीएओ नेमणूक विषयाबाबत राहुरी तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेत तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी केले आहे.राहुरी येथील तहसील कार्यालयात बुधवारी दि.13-12-2023 रोजी दुपारी 4:00 वा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उपस्थित पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार राजपूत बोलत होते. राहुरी विधानसभा मतदारसंघामधील नव मतदार नोंदणी, प्रारूप मतदार यादी, मतदान केंद्रांची माहिती, नवीन ईव्हीएम किंवा व्हिव्हिपॅट जनजागृती मोहीम, बीएलओ नेमणूक इत्यादी निवडणूक विषयाबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
Leave a reply