Disha Shakti

Uncategorized

ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव येथे तालुकास्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शन 2023 चे संपन्न

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : शिक्षण विभाग पंचायत समिती नायगाव खै. ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शन सन 2023 चे आयोजन ग्रीन व्हॅली स्कूल मध्ये आज दिनांक .14 /12/2023 गुरुवार सकाळी ठीक 09:30 ते 03:00 या वेळात करण्यात आले.

या विज्ञान प्रदर्शनाचे मुख्य उद्घाटक मा.श्री नंदकुमार काकडे (गटशिक्षणाधिकारी) केंद्रप्रमुख श्री .शिवराज साधू सर, यांनी केले. याप्रसंगी सौ. सरोज धरणे (प्राचार्या ग्रीन व्हॅली) श्री.रेनगुंटवार सर (मु.आ.कन्या शाळा नायगाव) श्री.नलबलवार सर, मुजाहीद शेख सर (कार्यप्रमुख) श्री.उद्धव ढगे सर,कपिल गारटे सर, रेडेवाड माधव सर, चिकलवाड सर, कांबळे विजय सर उपस्थित होते.

या प्रसंगी मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर भेदेकर सर यांनी स्वागत गीत प्रस्तुत केले. डॉ. मा. श्री आशिष मोकाटे सर (विज्ञान विभाग प्रमुख GVIS ) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले मा.साधू सरांनी विज्ञान प्रदर्शन आणि शालेय शिक्षण विभागाची भूमिका* या विषयावर आपले मत व्यक्त केले तर  मा. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी याप्रसंगी विज्ञान हा जीवनाचा अविभाज्य भाग कसा आहे? याविषयी आपले मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. नवनाथ वरवटे सर यांनी केले मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात रिबीन कापून करण्यात आली. या प्रदर्शनात नायगाव तालुक्यातील विविध माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर केले ज्यात माध्यमिक स्तरातून 20 तर प्राथमिक गटातून 32 प्रकल्प सहभागी झाले. या विज्ञान प्रदर्शनाचा एक नवोपक्रम म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ या विषयावर एकूण 18 शाळांनी आपला प्रयोग सादर केला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!