Disha Shakti

Uncategorized

भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, वासुंदे संचलित आदर्श विद्यालय पळसपुर गणित – विज्ञान व कला प्रदर्शन संपन्न

Spread the love

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर तालुक्यातील पळसपूर येथील आदर्श विद्यालयात आंतर शालेय गणित – विज्ञान व कला प्रदर्शन तसेच रांगोळी स्पर्धा व इतर स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. याचबरोबर विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व शिवचरित्र या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या प्रसंगी युवा व्याख्याते दत्ताजी कुलट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी पळसपुर गावच्या विद्यमान सरपंच रुपालीताई वाघमारे, पोखरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. काशिनाथ आंधळे साहेब शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य तसेच पळसपुर, काटाळवेढा, डोंगरवाडी, ढगेवाडी, कारवाडी, शिंदेवाडी, शिंदेवाडी फाटा, ईटकाई मळा, गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसपुर, कारवाडी, ढगेवाडी शाळांचे मुख्याध्यापक सर्व सेवकवृंद तसेच आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एस.बर्वे सर सर्वशिक्षक -शिक्षकेतर बंधु यावेळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी स्वकल्पनेतून व शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विविध प्रकारचे विज्ञान, गणित विषयक मॉडेल्स, कलेच्या माध्यमातून रांगोळ्याची व सांस्कृतिक कार्यक्रमातून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा प्रकारचे विविध उपक्रम नेहमी विद्यालयात राबवावेत अशी अपेक्षा विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!