Disha Shakti

Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना पुन्हा ईडीचे समन्स

Spread the love

राहुरी / रमेश खेमनर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीन 13 कोटी 37 लाख रूपयांच्या मनी लाँड्रिंगचा ठपका ठेवला आहे. साखर कारखान्याच्या संदर्भात संदर्भात व्यवहार करताना हा घोटाळा झाल्याचे ईडीचे म्हणणे आहे. आता या संदर्भात मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. एन. रोकडे यांनी प्राजक्त तनपुरे आणि अन्य आमदारांना 12 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री दरम्यान कोट्यवधी रूपयांचा घोटाळा झाला. तसेच यामध्ये मनी लाँड्रिंगही झालं असे ईडीचे म्हणणे आहे. यासंदर्भात आ. प्राजक्त तनपुरे, आ. सुभाष देशमुख, आणि आ. रणजीत देशमुख यांना समन्स बजावण्यात आले आहे. या आमदारांसह प्रसाद शुगर अलाईड आणि अ‍ॅग्रो प्रॉडक्ट लिमिटेड तसेच तक्षशिला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड प्रमुखांनाही न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. ईडीच्या आरोपानुसार, राम गणेश गडकरी साखर कारखाना जेव्हा विकला गेला.

तेव्हा बाजारभावानुसार त्याची किंमत 26 कोटी 32 लाख रूपये एवढी होती. मात्र हा साखर कारखाना केवळ 12 कोटी 95 लाख रूपयांमध्येच विकला गेला. यात 13 कोटी 37 लाख रूपयांचा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचे ईडीचे मत आहे. ईडीने या कारखान्याची जागाही गिळंकृत करण्याचा आरोप ईडीने केला आहे याबाबत महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेने एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात मूळ गुन्हा दाखल केला होता. ईडीने या गुन्ह्याच्या आधारे ईसीआयआर नोंदवलेला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!