Disha Shakti

Uncategorized

शिर्डी येथील द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा ; डि.वाय.एस.पी. संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : दि. 21/12/2023 रोजी डि.वाय.एस.पी. संदीप मिटके यांना शिर्डी येथील पिंपळवाडी रोडचे बाजूस द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन 4 पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे एक महिला एजंट आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस कर्मचारी सुनंदा भारमल यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डि.वाय.एस.पी. संदीप मिटके , पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, हे.कॉ. इरफान शेख, हे.कॉ.अशोक शिंदे, हे.कॉ. बाबा खेडकर , लेडी पो.कॉ.सुनंदा भारमल, पो.नाईक श्याम जाधव, पो.कॉ.दिनेश कांबळे, पो.कॉ.सोमेश गरदास, चालक हे.कॉ.आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!