Disha Shakti

Uncategorized

नाशिकमध्ये लष्कराच्या वाहनाची दुचाकीला धडक, सहाय्यक पोलिस निरीक्षक कुंदन सोनवणे यांचा मृत्यू

Spread the love

नाशिक प्रतिनिधी / खंडू कोळेकर : नाशिकमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात कार्यात असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक कुंदन सोनवणे यांचं अपघातात निधन झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्तव्यावरून घरी जाताना वडनेर रोड परिसरात असलेल्या लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ लष्कराच्या गाडीचा त्यांच्या दुचाकीला धक्का लागला. धक्का लागल्याने देवळाली पोलीस स्थानकात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांचा अपघात झाला होता. मात्र लष्करी जवानांनी त्यांना उपचारासाठी लष्करी रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती मिळत आहे.

याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद झालेली नाही. या अपघाताचे काही फोटोही समोर आले आहेत. कुंदन सोनवणे यांची दुचाकी लष्करी वाहनाच्या पुढील चाकाखाली आल्याचं दिसत आहे. अंगावर शहारे आणणारे हे फोटो आहेत. घटनास्थळी पोलीसही दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याची पूर्ण माहितीही पोलीस घेत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!