शेख युनूस / अहमदनगर प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील साकूर ते साकूर फाटा येथील रस्त्यावरील गतिरोधक हे साकूर येथील सामाजिक युवक कार्येकर्ते सुनील इघे यांच्या पत्राची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने गतिरोधक काढले. सविस्तर माहिती अशी कि, साकूर फाटा ते साकूर हे सुमारे १६ किमी अंतर असून येथील रस्ता हा प्रवासी, दळण वळणाच्या दृष्टीने उत्कृष्ट आणि सोईस्कर असल्यामुळे साकुर, पारनेर, राहूरी आदी पंचक्रोशीतील चार चाकी, दोन चाकी, बसेस या मार्गाने जातात परंतु या मार्गावरील गती रोधक हे विनाकारण जागो जागी टाकून प्रवासी आणि रोड वरील काही खड्डे असल्यामुळे वाहन चालकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता तर काही या गती रोधक वरून पडले असून मणक्याचे आजार, आणि आपल्या वाहनाचे होणारे नुकसान आदी गोष्टी लक्षात घेता साकूर येथील सामाजिक युवक कार्यकर्ते सुनील इघे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्र व्यवहार करून संबंधित अधिकारी यांना सांगून साकूर फाटा ते साकूर येथील अवैध गतिरोधक काढण्यास सांगितले असता सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन प्रवासी जनतेचा मार्गे सुखकर केला.
सध्या धावपळीचे युग असून वेळेची कमतरता असल्यामुळे रस्त्यावर असलेले गती रोधक आणि खड्डे प्रवासी वर्गाला हानिकारक असल्यामुळे काहींना मणक्याचे आजार वाढले होते. महिला आणि वयोवृद्ध यांना प्रवास करताना येथील गतिरोधक मुळे शारीरिक आणि मानसिक आजार झालेले असल्यामुळे गतिरोधक हे त्वरित काढावे अशी मागणी केली आणि पाठपुरावा केला. सुनील इघे यांच्या या कार्याचे प्रवाशी वर्गातून कौतुक आणि आभार व्यक्त होत आहे.
Leave a reply