Disha Shakti

Uncategorized

करमाळा व माढा तालुक्याच्या पोलीस पाटील पदाची निवड प्रक्रिया पारदर्शी व्हावी – मा.सरपंच देविदास आप्पा साळुंके

Spread the love

कर्जत प्रतिनिधी / भगवान पाटील : ‘करमाळा व माढा तालुक्यातील पोलीस पाटील पदाची निवड प्रक्रिया चालू आहे त्या सदर्भात कोंढार चिंचोली सरपंच देविदास साळुंके यांनी मा जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देऊन ही निवड प्रक्रिया पारदर्शी करणे कामी योग्य मागणी केली आहे त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी परीक्षेविषयी सांगताना आधी सर्व उमेदवारांचे गुण प्रसिद्ध करून त्यात सर्वात जास्त गुणांच्या उमेदवाराचा विचार करून त्याची पोलीस पाटील पदासाठी विचार व्हावा व सर्व पात्र उमेदवारची मुलाखती घेताना व्हिडीओ शूटिंग घ्यावे म्हणजे निवड प्रक्रिया पारदर्शी होईल.

प्रांतधिकारी कुर्डुवाडी यांनी काढलेल्या दि 14/9/2023 च्या जाहीनाम्यात अट क्र 19 मध्ये पात्र उमेदवारची फक्त यादी प्रसिद्ध करण्यात येईल व गुण प्रसिद्ध केले जाणार नाहीत याचा अर्थ काय होतो असेही श्री साळुंके यांनी म्हटले आहे यात दोन्ही तालुक्यातील लोकप्रतिनिधि यांनी त्वरित लक्ष देण्याची गरज आहे असे साळुंके यांनी प्रश्न उपस्थित करून निवड प्रक्रिया ही पारदर्शी व्हावी अशी मागणी महसूल प्रशासन कडे लेखी केली आहे अशी निवड करणे कामी वरिष्ठानी त्वरित लेखी आदेश निवड समितीचे अध्यक्ष मा प्रांतधिकारी व निवड समिती सदस्य मा तहसीलदार करमाळा, माढा देणेत यावेत अशी लेखी पत्राने दि 23/12/2023च्या पत्राने साळुंके यांनी केली असुन त्या पत्रांच्या कॉपीज सर्व अधिकारी यांना पाढविल्या आहेत तेव्हा या मागणीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तेव्हा प्रशासन काय करते ते पाहणे गरजेचे आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!