विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : दि.23/12/23 रोजी डि.वाय.एस.पी. संदीप मिटके यांना गुप्त माहिती मिळाली की वेस ता.कोपरगाव येथील आरोपी 1) राजु नसीर ईनामदार वय-27 रा.वेस ता.कोपरगाव याचे घराजवळ असणारे पत्र्याचे शेडमध्ये तसेच आरोपी 2)तन्वीर गणीभाई सय्यद वय-21 रा.वेस ता.कोपरगाव याचे वेस ते रांजणगाव रोडचे कडेला असलेले पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीकरिता गोवंश जातीचे जनावरे आखुड दोऱ्याने बांधून ठेवले बाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करण्याकरिता पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना आदेश देण्यात आले.
पंचासह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या 48 गोवंश जनावरे ताब्यात घेऊन त्यांची गोशाळेत रवानगी केली व दोन आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी 1) हेड कॉन्स्टेबल अविनाश मकासरे फिर्यादी 2) हेड कॉन्स्टेबल इरफान शेख यांचे फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.1117/2023 आणि 1118/2023 नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध कायदा अधिनियम 1976 चे सुधारित 2015 कलम 5(क),9(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, डि.वाय.एस.पी.संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, अशोक शिंदे, अविनाश मकासरे, सचिन धामणे, संदीप डमाळे, सागर सदाफळ, दिनेश कांबळे, सोमेश गरदास तसेच चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गोलवड , चालक हेड कॉन्स्टेबल आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे.
कोपरगाव मधील वेस येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 48 गोवंश जनावरांची सुटका व दोघांविरुद्ध गुन्हादाखल

0Share
Leave a reply