नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ मिलिंद बच्छाव : नायगाव व बिलोली तालुक्यातील मागील दहा वर्षापासून रिक्त असलेली पोलीस पाटलांची पदे तब्बल एका दशकानंतर भरती करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असून दोन तालुक्यातील समान अंकात शंभर पोलीस पाटलांच्या पदाची भरती करण्यासाठी आरक्षणाची सोडत दिनांक 28 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असल्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी करण्यात आले आहेत.
गाव पातळीवर पोलीस आणि सर्वच शासकीय कामासाठी अतिशय महत्त्वाचा दुवा असलेली पोलीस पाटलांची पदे मागील एका दशकापासून रिक्त ठेवण्यात आल्याने प्रशासनावरचा ताण वाढला होता, ज्या गावची पोलीस पाटील सेवानिवृत्त झाले त्यांच्या मार्फतच हवी ती माहिती घेतली जात होती.
पोलीस पाटलांची रिक्त पदांची भरती करण्यात यावी ही मागणी मागील दहा वर्षापासून केली जात होती. पण सरकारने त्याची दखल घेतली नाही. कमी काळात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक पाहता राज्यातील तालुक्यात गाव पातळीवर चांगला संदेश देण्यासाठी पोलीस पाटलांची भरती करण्यासाठी आरक्षणाची नियोजन नायगाव बिलोली तालुक्यासाठी दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी आरक्षणाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नायगाव तालुक्यातील कांडाळा, रुई बु., मुस्तापूर, वंजारवाडी, दरेगाव, अंचोली, पिंपळगाव, मनुर, डोंगरगाव ,रातोळी, वजीरगाव, खैरगाव धनज, मांजरमवाडी, खंडगाव, मांडणी, माहेगाव ,धुप्पा, लालवंडी,आलूवडगाव, केदारवडगाव, कोठाळा, निळेगव्हाण, कार्ला, राजगड नगर , सोमठाणा, कोलंबी, देगाव, सालेगाव, मरवाळी, बेंद्री ,शेळगाव गौरी, होटाळा, शेळगाव छत्री, सातेगाव, ओराळा रुई. खु, बळेगाव, इकळीमाळ, टाकळी बू, इकळीमोर, इज्जतगाव, घुंगराळा, पळसगाव, कोकलेगाव व रातोळी तांडा अशी तालुक्यातील गावांची नावे आहेत नायगाव तालुक्या प्रमाणेच बिलोली तालुक्यातील 50 गावांच्या पोलीस पाटलांच्या भरतीची आरक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे
उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय बिलोली येथे पोलीस पाटील पदाच्या भरतीबाबत आरक्षण सोडत

0Share
Leave a reply