दौंड प्रतिनिधी / नितीन पाटुळे : माळवाडी येथील श्री दत्त औदुंबर सेवा संस्था यांच्या वतीने दत्त जन्म मिती मार्गशीर्ष शु.पोर्णीमा शके १९४५ मंगळवार 26 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून दोन मिनिटे दत्त जन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.माळवाडी पडवी येथे दत्त मंदिर रंधवे वस्ती येथे सद्गुरू श्री आण्णा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त जयंती सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला.या सोहळ्यात पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी सहभाग घेतला व श्री दत्त महाराज यांचे दर्शन घेतले.
माळवाडी येथील श्री दत्त मंदिरात भाविकांची गर्दी मोठ्या संख्येने दिसून आली. माळवाडी येथे श्री दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र सप्ताह पारायण सोहळा आयोजित केला होता. या पारायणासाठी १४०ते१५० भाविकांनी सहभाग घेतला होता.दत्त मंदिर माळवाडी येथे सद्गुरू श्री आण्णा महाराज यांच्या हस्ते शनिदेवतेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.श्री दत्त जयंती निमित्त पंचक्रोशीतील दहा ते पंधरा हजार भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.
दिनांक २६/१२/२३ रोजी सकाळी सात वाजता श्री दत्त महाराज यांची आरती करण्यात आली नंतर सात ते नऊ या वेळेत गुरुचरित्र पारायण समाप्ती व सत्यनारायण पूजा करण्यात आली.सकाळी नऊ ते अकरा या वेळेत श्री दत्त महाराज यांचा अभिषेक करण्यात आला.सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत श्रीदत्त याग व होमहवन करण्यात आले, दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत दत्त गीत व भजनाचा कार्यक्रम पार पडला.दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत हे.भ.प.शिवाजी महाराज पहाणे यांचा हरिकिर्तनाचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला.
सायंकाळी ठीक ६ वाजून ०२ मि.श्री दत्त महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला व जमलेल्या भाविकांनी गुलाल व फुले उधळण करीत आनंद व्यक्त केला.नंतर ठीक सात वाजता आलेल्या भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. वरील सर्व कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडले व या कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांनी व सेवेकरी भक्त यांनी सहकार्य केले. सद्गुरू श्री आण्णा महाराज यांनी आलेल्या भाविकांना व सेवेकरी यांना आशिर्वाद देऊन आभार मानले.
Leave a reply