विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : गुरुवार दि. 28/12/23 रोजी श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील कर्मचारी अविनाश आदलिंगे आणि अण्णासाहेब परदेशी सुरक्षा अधिकारी यांनी डीवायएसपी संदीप मिटके यांना माहिती दिली की मागील तीन दिवसापासून एक इसम साई उद्यान येथे राहण्यास आहे. डीवायएसपी संदीप मिटके यांनी सदर संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की, माझ्याविरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन पुणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याने दीड महिन्यापासून बेंगलोर, राजस्थान, बागेश्वर धाम आणि शिर्डी येथे लपून राहत आहे.
त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या कडे सदर आरोपी बाबत चौकशी केली असता त्यांनी कळविले की, सदर आरोपी विरुद्ध दि.10/11/2023 रोजी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सदर आरोपीने (वय 50 वर्षे) स्वतःच्या अल्पवयीन मुलीला (वय 16 वर्षे) जीवे मारण्याची धमकी देऊन तिचेवर एप्रिल 2023 पासून वारंवार लैंगिक अत्याचार केले त्यामुळे पीडित मुलगी ही सध्या सात महिन्याची गरोदर आहे. त्याचे विरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 547/2023 भादवी कलम 376 (2)(f),( j),376(2)(3),(n),323,506 सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,5(j),(2),5(L),6,8,12 कलमान्वये गुन्हा दाखल आहे. त्यावेळे पासून आरोपी फरार आहे. सदर आरोपीस पुढील तपासकामी वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पुण्यात स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून गरोदर करणारा फरार आरोपी शिर्डीतून जेरबंद

0Share
Leave a reply