Disha Shakti

सामाजिक

गुहा येथे माजी मंत्री व आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते कानिफनाथ मूर्तिची स्थापना

Spread the love

प्रतिनिधी /  शेख युनूस : राहुरी तालुक्यातील गुहा येथे माजी मंत्री व जिल्हा बँक चे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते गुहा येथे कानिफनाथ महाराजांची मूर्ती ची स्थापना करण्यात आली. गुहा गावात एका धार्मिक स्थळावरून वाद सुरु असताना गुहा येथील गावाकऱ्यांसह कानिफनाथ भक्तांनी वेद मंत्राचा गजर करत आणि भजन करत कानिफनाथ महाराजांची मूर्ती बसवली. गुहा येथील भक्तांनी अचानक मूर्तीची स्थापना करत प्राण प्रतिष्ठापणा केल्याने पोलीस प्रशासनाची मोठया प्रमाणात धावपळ उडाली. गुहा गावात मोठया प्रमाणावर फौज फाटा दाखल झाला होता.

गुहा गावात अनेक दिवसापासून कानिफनाथ महाराजांच्या स्थळा वरून जातीय वाद सुरु आहे.गेल्या काही दिवसा पासून या वाद ग्रस्त जागेतील कानिफनाथ महाराज यांचे भजन सुरु असताना भक्ताना मारहाण करत जातीय तेढ निर्माण झालेला असून दोन समाजातील वाद होऊन परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले होते. धार्मिक कार्यक्रमाला विरोध झाल्याने राहुरी तहसील कार्यालयावर हिंदू जनआक्रोश मोर्चा निघाला होता. गुरुवारी पहाटे गुहा येथील भक्तांनी कानिफनाथ महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.

गुहा येथील त्या वादग्रस्त जागेवर मूर्ती बसवली असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस उपअधीक्षक डॉ.बसवराज शिवपुजे, राहुरी पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, प्रांतधिकारी किरण सावंत, नायब तहसीलदार संध्या दळवी, यांच्यासह मोठा फौज फाटा दाखल झाला होता.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!