राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : रमेश खेमनर : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषद पुणे विभागाच्या अध्यक्षपदी राहुरी येथील एज्युकेशन सोसायटीचे कनिष्ठ महाविद्यालय राहुरी, येथील प्राध्यापक मनोजकुमार जाधव यांची निवड करण्यात आली. निवडीची घोषणा महाराष्ट्र राज्य इतिहास परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक सुनील शिंदे सर यांनी केली.
तसेच यावेळी प्राध्यापक भुजाबा माने (सदस्य, महाराष्ट्र राज्य), तसेच मुकुंद सावळकर (सदस्य, महाराष्ट्र राज्य), प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी (सदस्य, महाराष्ट्र राज्य) हे यावेळी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तसेच विभागीय कार्यकारिणीचे सदस्य व राज्यसंघाचे पदाधिकारी व कार्यकारणी यावेळी उपस्थित होती. त्यांच्या या निवडीबद्दल राहुरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सौ. प्रभावतीताई सतीश बिहाणी , सचिव श्री मनोज बिहानी तसेच सहसचिव अनुप बिहानी, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री कैलास अनाप यांनी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीअभिनंदन केले आहे.
Leave a reply