प्रतिनिधी / शेख युनूस : गुहा येथील धार्मिक वाद न्यायालयीन असताना सुद्धा गुहा येथे काही विघ्न संतोषी आणि अशांतता पसरविणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन हजरत बाबा रमजान यांच्या दर्गामध्ये बेकायदेशीर मूर्ती ठेवली.राहुरी तालुक्यातील गुहा येथील हजरत बाबा रमजान यांच्या दर्गे मध्ये २८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी. ९ वाजता पोलीस अधिकारी व तहसीलदार यांच्या समक्ष गुहा येथीलवाद ग्रस्त दर्गेमध्ये कानिफनाथ महाराजांची बेकायदेशीर मूर्ती बसवून देण्यात आली असल्याच्या घटनेच्या निषेधार्थ गुहा येथील मुस्लिम समाजाच्यावतीने राहुरी तहसील येथे सकळी धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
कायदा हा सर्वाना समान असून गुहा येथील अल्पसंख्यांक मुस्लिम बांधवाना विनाकारण मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून या समाजावर, अन्याय होत आहे. गुहा येथील पूर्वकालीन हजरत शाह बाबा रमजान यांच्या दर्गत बेकायदेशीर मूर्ती ही पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, जिल्हा उप अधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, प्रांतधिकारी किरण सावंत, नायब तहसीलदार संध्या दळवी, आणि काही विघ्न संतोषी, अशांतता पसरविणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन बेकायदेशीर मूर्ती बसवून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आणि मानसिक त्रास देऊन बेकायदेशीर कृत्य करून न्यायालयीन आदेशाची पायमल्ली करत हुकूमशाही करून गुहा येथील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजावर अन्याय करून त्रिबूनल वकफ् ९ मार्च २०२३ च्या आदेशानुसार गट. नंबर २३ गुहा येथील हजरत रमजान बाबा दर्गाह मध्ये येथील मुस्लिम धर्माच्या धार्मिक विधी शिवाय इतर कुठलाही विधी करू नये अशा मनाई हुकूम प्रशासनाच्या निर्देशनात दिलेला आहे.
सदरील वाद न्याय प्रविष्ट असताना असे बेकायदेशीर कृत्य करण्यात आले असून वाद ग्रस्त जागेतील मूर्ती ठेवत असताना येथे उपस्थित असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मूर्ती ठेवण्यास मनाई विनंती करण्यात आली असता त्यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकारी यांनी म्हटले कि, तुम्ही न्यायालयीन आदेश आणून मूर्ती बाहेर काढा असे उत्तर मिळाले.
बहुसंख्य समाजाकडून अल्पसंख्यांक मुस्लिम समाजावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट चित्र समोर असताना पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका का घेतो अशी प्रतिक्रिया मुस्लिम समाजाकडून होताना दिसली. कायदा, नियम, सुव्यवस्था सर्वांना समान असून आज मुस्लिम समाजावर अन्याय का होत आहे ? मुस्लिमांना अन्याय, त्रास का ? मुस्लिमांना न्याय का मिळत नाही,? जाती पातीचे राजकारण न करता अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाला न्याय मिळावा आणि सदरील वाद ग्रस्त गुहा येथील मुस्लिमांना संरक्षण देण्याऐवजी घटनेच्या हक्काची पायमल्ली करत आहे. गुहा येथील हजरत शाह रमजान बाबा दर्गाहत ठेवलेली वादग्रस्त मूर्ती, दानपेटी, लाऊड स्पीकर, काढून जैसे थे परिस्थिती करावी
गुहा गावात शांतता प्रस्तापित करावी मुस्लिमांना स्वरक्षण दयावे तसेच बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करावी असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. वाद ग्रस्त जागेतील ठेवलेली मूर्ती जो पर्येंत काढण्यात येत नाही तो पर्यंत संपूर्ण मुस्लिम बांधव आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा पवित्रा मुस्लिम बांधवानी घेतला आहे. यावेळी शौकत भाई तांबोळी, जुनेद शेख, रज्जाक शेख, इम्रान शेख, कासम शेख, करीम शेख, इसाक शेख, इंनूस शेख, राजूभाई शेख, समीर शेख, इस्माईल शेख, व गुहा येथील मुस्लिम बांधव आणि भगिनी, तसेच राहुरी तालुक्यातील पंचक्रोशीतील मुस्लिम मोठया संख्येने उपस्थित होते.
Leave a reply