Disha Shakti

क्राईम

कोपरगाव येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा दोन आरोपी ताब्यात : डी.वाय.एस.पी. संदिप मिटके यांच्या पथकाची कारवाई

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : शनिवार दि. 30/12/2023 रोजी डी.वाय.एस.पी. संदीप मिटके यांना गुप्त बातमी धारामार्फत माहिती मिळाली की कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये साईगंगा मोटर गॅरेज मध्ये मनोज गिरमे हा इसम चार चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळवून संयुक्त कारवाई करण्याकरिता माहिती दिली असता त्यांनी तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे यांना संयुक्त कारवाई करण्याकरता पाठवले त्यावर सदर ठिकाणी पथकातील पोलीस अमलदार पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन दोन चार चाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व 19 घरगुती गॅस टाक्या तसेच 2 कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आले आहेत तसेच 1) मनोज चंद्रकांत गिरमे वय 43 रा. खडकी रोड तालुका कोपरगाव 2) अल्ताफ बाबू शेख – वय 48 रा. मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक या आरोपिंना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहने , गॅस टाक्या, मशीन असा एकूण 4,66,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3,7 आणि भारतीय दंड संहिता 1860 कलम 285 अंतर्गत पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डी.वाय.एस.पी.संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे, इरफान शेख, अशोक शिंदे, श्याम जाधव, गणेश काकडे , तावरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!