राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दरोडा, मारहाण करणार्या तडीपार झालेल्या टोळीचा राहुरी परिसरात उच्छाद सुरूच आहे. जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई होऊनही राहुरी परिसरातच ठाण मांडणार्या टोळीतील पाच ते सहा जणांकडून एका तरूणाच्या डोक्यात दारूच्या बाटल्या फोडत लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी शहरात दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी घडली आह़े.
दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास आकाश बाळासाहेब थोरात, वय २५ वर्षे, रा. मल्हारवाडी रोड, राहुरी. हा तरुण राहुरी शहरातील जूने कोर्टाजवळ त्याची मोटारसायकल रस्त्याच्या कडेला लावून लघूशंकेसाठी थांबला होता. तेव्हा तेथे रोडच्या बाजुला उभे असलेले आरोपींनी काही एक कारण नसतांना आकाश थोरात याला लाथाबुक्क्यांने मारहान केली. तसेच बियरची बाटली डोक्यात मारुन जखमी केले. आणि आकाश थोरात याच्या मोटारसायकलवर दगड मारुन मोटारसायकलचे नुकसान केले. तु जर आम्हाला परत दिसला तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. जखमी झालेल्या आकाश थोरात याच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सनि गोरख मेहत्रे व भारत भाऊसाहेब ढोकणे, दोघे रा. राहुरी, व दोन अनोळखी तरुण अशा चार जणांवर गुन्हा रजि. नं. १४४७/२०२३ भादंवि कलम ३२४, ३२३, ५०६, ४२७, ३४ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
राहुरी परिसरात वाढलेली गुन्हेगारी व पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे गुन्हेगारी प्रमाण वाढले आह़े. अहमदनगर जिल्ह्यातून काही महिन्यापूर्वी एका टोळीला १८ महिन्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या आदेशान्वये तडीपार केले होते. संबंधित टोळीचा परिसरात वावर असल्याची चर्चा होती. त्याच टोळीने शहरामध्ये मोठा उच्छाद घातल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यातून तडीपार असूनही तालुक्यात वावरणार्या टोळीला पोलिस प्रशासनाकडून अभय मिळत असल्याची चर्चा आहे. राहुरी पोलिस प्रशासनाच्या कारभाराबाबत चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे हे करीत आहेत.
Leave a reply